एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकRaid 2 Box Office Collection Day 18: अजय देवगण टॉम क्रूजवर पडला भारी, अठराव्या दिवशीही धुवांधार कमाई; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Raid 2 Box Office Collection Day 18: अजय देवगणसमोर हॉलिवूड स्टार टॉम क्रूझही फिका पडला आहे. अठराव्या दिवशीही 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहेत.
By : नामदेव जगताप|Updated at : 19 May 2025 06:38 AM (IST)
Raid 2 Box Office Collection Day 18
Source :
ABP MajhaRaid 2 Box Office Collection Day 18: अजय देवगणचा 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर 1 मे रोजी प्रदर्शित झाला आणि भल्याभल्या दिग्गजांच्या तोंडचं पाणी पळालं. चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करतोय. 'रेड 2'नं तिसऱ्या रविवारीही जोरदार कमाई केली आहे. गेल्या दोन रविवारी जशी सिनेमानं धमाकेदार कमाई केली त्याच प्रमाणे, तिसऱ्या रविवारीही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अजय देवगणनं साकारलेली अमय पटनायकची भूमिका प्रेक्षकांना खूप भावतेय. सिनेमा रिलीज झाल्याच्या तिसऱ्या रविवारीही प्रेक्षकांची झुंबड उडाल्याचं दिसतंय. अठराव्या दिवशी सिनेमाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, तर आजपर्यंत चित्रपटानं किती कमाई केली? ते सविस्तर जाणून घेऊयात...
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अधिकृत आकडेवारीनुसार, चित्रपटानं 15 दिवसांत 140.22 कोटी रुपये कमावले होते. सॅकनिल्कच्या मते, काल म्हणजेच, 16 व्या दिवशी ही कमाई 4.15 कोटी, म्हणजेच 16 दिवसांत ही कमाई 144.37 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
View this post on Instagram
सॅकनिल्कच्या मते, आज सकाळी 10:20 वाजेपर्यंत चित्रपटानं 5.50 कोटी रुपये कमावून 149.87 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाच्या कमाई संदर्भात समोर आलेले आकडे अंतिम नाहीत, ते बदलू शकतात.
'रेड 2' अजय देवगणच्या कारकिर्दीतील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
'रेड 2' हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील सातवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटानं सिंघम रिटर्न्सच्या (140.62 कोटी) लाईफटाईम कमाईचा विक्रम मागे टाकत, हा रेकॉर्ड बनवला आहे. आता, हा चित्रपट लवकरच 'शैतान'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला (149.49 लाख) मागे टाकेल अशी अपेक्षा आहे.
'मिशन इम्पॉसिबल 8', 'फायनल डेस्टिनेशन 6' समोरही अजयचा स्टारडम अबाधित
एकीकडे, जगातील सर्वात मोठ्या चित्रपटाचा आठवा भाग, मिशन इम्पॉसिबल, बॉक्स ऑफिसवर पोहोचला आहे. टॉम क्रूझच्या या चित्रपटानं 2025 मधील दीड डझनहून अधिक सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांचा पहिल्या दिवशीचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटांमध्ये जाट, स्काय फोर्स आणि केसरी 2 सारखे चित्रपट देखील समाविष्ट आहेत.
दुसरीकडे, लोक 'फायनल डेस्टिनेशन' हा अद्भुत हॉरर चित्रपट पाहण्यासाठी देखील गर्दी करत आहेत. या चित्रपटानं गेल्या 3 दिवसांत 16 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. असं असूनही, अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही, उलट, गेल्या 4-5 दिवसांपेक्षा जास्त कमाई करत आहे.
दरम्यान, 'रेड 2' हा चित्रपट राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यातील तणाव दाखवण्यात आला आहे. सौरभ शुक्ला, वाणी कपूर आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 48 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'रेड 2'नं जगभरात सुमारे 200 कोटींची कमाई केली आहे.
Published at : 19 May 2025 06:38 AM (IST)
Tags :
Ajay Devgn Tom Cruise BOLLYWOOD HOLLYWOOD Raid 2 BOX Office Collection BOX Office
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion